Sat, Apr 20, 2019 15:51होमपेज › Nashik › नाशिक शहराचे तापमान चाळिशीकडे

नाशिक शहराचे तापमान चाळिशीकडे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : नाशिकमध्ये गुरुवारी (दि.29) 38.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, थंड नाशिक तापायला सुरुवात झाली आहे. वाढत्या उकाड्याने शहरवासीय हैराण झाले आहेत.

या आठवड्यात तापमानाचा पारा पस्तीशी पार झाला. दोन दिवसांपासून तर तापमानाने चाळिशीकडे वाटचाल सुरू केली आहे. सकाळी अकरापासून उन्हाच्या झळा जाणवत असून, दुपारी तर उकाड्यात वाढ होत आहे. बुधवारी 37.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेल्यानंतर दुसर्‍याच दिवशी यात एक अंश सेल्सिअसने वाढ झाली. उन्हाचा चटका जाणवत होता. त्यातच सरकारी सुट्टी असल्याने रस्त्यांवरील वर्दळही कमी भासत होती.


  •