Wed, May 22, 2019 21:09होमपेज › Nashik › नाशिक ऽ12.6 

नाशिक ऽ12.6 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

गत आठवड्यात 19 अंशांवर पोहोचलेला पारा शनिवारी (दि.25) अवघ्या 12.6 अंशांवर आल्याने थंडीचा कडाका वाढला असून, नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्या आणि उबदार कपड्यांची मदत घेत आहेत. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात तीन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे तापमानात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे नागरिकांना थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला होता.  शनिवारी जिल्ह्यात 12.6 अंश तापमान नोंदविण्यात आले. थंडीचा कडाका वाढल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.