Sun, Jan 20, 2019 14:19होमपेज › Nashik › सातपूरला वाहनाच्या धडकेत बालिकेचा मृत्यू

सातपूरला वाहनाच्या धडकेत बालिकेचा मृत्यू

Published On: Mar 04 2018 4:28PM | Last Updated: Mar 04 2018 4:28PMसातपूर : वार्ताहर  

त्र्यंबक महामार्गावरील सातपूर विभागीय कार्यालयाजवळ रस्ता ओलांडत असताना टाटा ४०७ वाहनाने दिलेल्या धडकेत बारा वर्षीय मुलीचा मृत्यू  झाला. ही घटना रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. सातपूर पोलिसांनी याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. रूखसार अन्सारी (वय १२) रा. सातपूर राजवाडा मूळ बिहार असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी, रूखसार ही आपल्या नातेवाईकांना बस स्टँड वर सोडवण्यास आपल्या दाजी व नातेवाईकांसोबत आली होती. स्टँड वरून घरी जात असताना कलायतन कुरियरच्या टाटा ४०७ क्रमांक एम एच ०४-३४२३ ने रूखसारला जोरदार धडक दिली या अपघातात ती जागीच ठार झाली आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक ए. वाय देवरे करत आहे.