होमपेज › Nashik › हॉटेलच्या संचालकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या 

हॉटेलच्या संचालकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या 

Published On: Aug 07 2018 4:02PM | Last Updated: Aug 07 2018 4:02PMसटाणा : प्रतिनिधी 

शहरातील नाशिक रस्त्यावर असलेल्या हॉटेल विरंगुळाचे संचालक संजय लाला सोनवणे (वय 33) यांनी राहत्या घरांत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी (दि.7)दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास लक्षात आलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे.

दुपार झाली तरी संजय हॉटेलवर न आल्याने त्यांचे बंधू सचिन त्यांना घरी पाहण्यासाठी गेले. दरवाजा बंद असल्याने सचिन यांनी आवाज दिला, मात्र बराच वेळ प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून आत पाहिले असता  भाऊ संजय घरातील छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यामुळे तत्काळ नातेवाईक, शेजारी आणि पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला असून या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. संजय यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.