Thu, Apr 25, 2019 11:47होमपेज › Nashik › घोटाळे अन् भ्रष्टाचाराची चौकशी सुरूच ठेवणार

घोटाळे अन् भ्रष्टाचाराची चौकशी सुरूच ठेवणार

Published On: Mar 01 2018 11:03PM | Last Updated: Mar 01 2018 10:47PMनाशिकरोड : वार्ताहर

नाशिक विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी त्यांच्या कार्यकाळातील उघड केलेल्या जमिनीचे घोटाळे आणि भ्रष्टाचारांच्या प्रकरणाची चौकशी सुरूच ठेवणार असून, संशयितांवर नियमाप्रमाणे कारवाई केली जाणार असल्याची माहिती नवनियुक्त आयुक्त राजाराम माने यांनी दिली. नाशिक विभागाच्या आयुक्तपदाच्या नऊ महिन्यांच्या कार्यकाळात महेश झगडे यांनी त्र्यंबकेश्‍वर येथील कोलंबिका देवस्थान ट्रस्टचा 75 हेक्टर जागेचा घोटाळा बाहेर काढला होता. त्याचप्रमाणे घोटाळे अन् भ्रष्टाचारात समावेश असणार्‍या काही भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय व्यक्तींवर देखील कारवाईची शिफारस झगडे यांनी केली होती.

माने यांनी म्हणाले की, आपण उपजिल्हाधिकारी,  जिल्हाधिकारी पदावर काम केल्याचा अनुभव असून, महसूल विभागात 30 वर्ष सेवा केली आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्‍वर येथील जमीन घोटाळ्याची माहिती घेऊन कारवाई करणार असल्याचे सांगितले. शासनाने राबविलेेली विकासकामे, योजना ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचविण्यावर भर दिला जाणार आहे. नाशिक विभागात असणारे विविध प्राधिकरण एकत्र करून विकासाचा उत्तम आराखडा तयार करण्याचा मनोदय यावेळी माने यांनी व्यक्त केला. नाशिक शहरामध्ये प्रशासकीय मध्यवर्ती इमारत उभारण्याच्या कामाचे नियोजन सुरू आहे. याविषयी माहिती घेऊन इमारतीचे काम अधिक वेगाने सुरू करण्याकरीता प्रयत्न केले जाणार असून पुरेसे मनुष्यबळ, प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारी आणि मुबलक साधनसामग्री उपलब्ध असेल तर प्रत्येक नागरिकांपर्यत विकासकामे पोहचविणे अवघड नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, प्रशासनात काम करतांना काही चुकीचे कामे होत असतात. त्याकडे वेळीच लक्ष द्यायला हवे, चुकीच्या कामांवरील कारवाई म्हणजेच दप्तर तपासणी तीव्रतेने व्हावी. दुर्देवाने कारवाईचे वेग मंद गतीने असल्याने जमिनी किंवा आर्थिक घोटाळे घडत असतात अशी खंत यावेळी महेश झगडे यांनी व्यक्त केली. 
तसेच, त्र्यंबकेश्‍वर येथील जागेच्या घोटाळ्याचे प्रकरण असोत अथवा महसूल विभागातील कर्मचारी, राजकीय व्यक्तींवरील कारवाईचा प्रश्‍न असोत, या प्रकरणात एखाद्या व्यक्तीला त्रास होत असेल तर मी यात काहीएक तडजोड करु शकत नाही. घटना, नियम आणि कायद्याप्रमाणे काम केले आहे. शासनाचा सेवक असल्याने शासनाचे नियम मला मान्य आहेत. बदली करणे हा शासनाचा अधिकार आहे. त्याला विरोध असण्याचे कारण नाही. बदली मिळाली की बढती यापेक्षा मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली हे महत्वाचे आहे. राज्याचे प्रधान सचिव पदावर काम करणे मला निश्‍चितपणे अशी भावना यावेळी झगडे यांनी व्यक्त केली.