Tue, Jul 16, 2019 22:43होमपेज › Nashik › आदिवासी विद्यार्थ्यांचे ‘नाक दबाव’ आंदोलन 

आदिवासी विद्यार्थ्यांचे ‘नाक दबाव’ आंदोलन 

Published On: Dec 19 2017 2:04AM | Last Updated: Dec 18 2017 10:53PM

बुकमार्क करा

नाशिकरोड : वार्ताहर

शासकीय आदिवासी आणि समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी भाजपा सरकारच्या विविध धोरणांच्या निषेधार्थ ‘नाक दबाव’ आंदोलन केले. यासाठी विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी (दि.18) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून विभागीय आयुक्‍त कार्यालयावर मोर्चा काढला.

शासकीय वसतिगृह कायदा झालाच पाहिजे, मोफत आणि सक्तीचे शिक्षण कायदा सर्व शैक्षणिक संस्थांना लागू व्हावा, प्रलंबित शिष्यवृत्ती तत्काळ मिळावी, डीबीटीचे अन्यायकारक  धोरण रद्द केलेच पाहिजे, अनुदानित वसतिगृहांचे अनुदान मिळावे, स्वयं आधार योजना बंद करावी तसेच प्रत्येकाला वसतिगृहात प्रवेश मिळावा, ओबीसी शिष्यवृत्ती अनुदान वाढवण्यात यावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. मोर्चा अनंत कान्हेरे मैदान-आदिवासी विकास आयुक्तालय-सारडा सर्कल, द्वारका-समाजकल्याण आयुक्त कार्यालय-बिटको पॉइंट या मार्गाने विभागीय आयुक्त कार्यालयावर गेला.

राज्यभरातील विविध वसतिगृहांतील एक हजाराहून अधिक विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यामध्ये  जालिंदर गिरे, उद्धव  रोमटे, स्वप्निल धांडे, संदीप कोकाटे, विकास पाखरे आदींसह विद्यार्थी सहभागी झाले होते.