Wed, Mar 20, 2019 12:45होमपेज › Nashik › नाशिक रोडला शाळेजवळ सापडली हाडांनी भरलेली बॅग

नाशिक रोडला शाळेजवळ सापडली हाडांनी भरलेली बॅग

Published On: May 15 2018 7:01PM | Last Updated: May 15 2018 7:01PMउपनगर वार्ताहर 

आनंद नगर जावली मनपा शाळा नंबर १२५ जवळ हाडांनी भरलेली निळ्या रंगाची बॅग सापडल्यामुळे  परिसरात खळबळ उडाली आहे. ही बॅग या ठिकाणी आलीच कशी याचा पोलीस शोध घेत आहेत.

मनपा शाळा नंबर १२५ च्या इगल स्पोर्ट क्लब च्या समोर असणार्‍या मोकळ्या जागेतील कचरा असणार्‍या ठिकाणी विशाल पांडव या नागरिकाला हाडांनी भरलेली बॅग दिसली. बॅग दिसल्यावर पांडव यांनी उपनगर पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. उपनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते,पोलीस उपनिरिक्षक संदीप कांबळे, गणेश जाधव आणि कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. या नंतर  फॉरेन्सिक लॅबला पाचारण करण्यात आले. या ठिकाणी फोरेन्सिक लॅबच्या सहाय्यक रासायनिक विशेषक प्रतिमा गोस्वामी या त्‍यांच्या टीम आणि फिरती प्रयोग शाळेला घेऊन बॅग आढळलेल्‍या ठिकानी दाखल झाल्‍या. त्यांनी ही  बॅग खोलून पहिली. त्यानंतर ही बॅग फिरत्या प्रयोग शाळेत ठेवण्यात आली. सदरील बॅगेमधील हाडे ही सिव्हील हॉस्पिटल च्या फोरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आली असून, ही हाडे मानवी आहेत, कि कृत्रिम आहेत याचा तपास फोरेन्सिक तज्ञ करीत आहे.

हाडे कृत्रिम असल्याचा फोरेन्सिक तज्ञांचा अंदाज -       

फिरेन्सिक तज्ञ प्रतिमा गोस्वामी यांनी सांगितले की ही हाडे मेडिकल कॉलेजच्या विद्यर्थ्याना शिकण्यासाठीची  कृत्रिम हाडे आहेत. काही हाडांना कलर मारलेला आहे.काही हाडांवर लिहिलेले ही असून ही हाडे कृत्रिम असल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.