Sun, Jan 20, 2019 06:53होमपेज › Nashik › कालव्यावरील अनधिकृत बांधकामे काढणार

कालव्यावरील अनधिकृत बांधकामे काढणार

Published On: Dec 13 2017 1:58AM | Last Updated: Dec 12 2017 11:58PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

सिटी सर्व्हेचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यात कालव्याच्या जमिनींवर अनधिकृत बांधकाम आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली. 

जमाबंदी आयुक्त एस. चोकलिंगम यांनी दोन दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासन, जलसंपदा व भूमी अभिलेख विभागाच्या अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली होती. त्यात कालव्यांसाठी घेतलेल्या जमिनींवर अनधिकृत बांधकामाचा मुद्दा उपस्थित करून अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. जमिनीवरील अतिक्रमणे कुणाची याबाबत माहितीही प्रशासनाच्या हाती नाही. यामुळे भूमी अभिलेख विभागाला सीमा आखणी करण्याचे आदेश दिले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर अनधिकृत बांधकामे आढळून आल्यास तत्काळ हटविली जातील, असे सांगत अनेक ठिकाणी सिटी सर्व्हेच झालेला नाही. यामुळे संबंधित जमिनी नेमक्या कुणाच्या आहेत याचीच माहिती प्रशासनाकडे नसल्याचे उघड झाले.