सिन्नर : प्रतिनिधी
नाशिक-पुणे महामार्गावरिल बंगाली बाबा ते शिंदेगाव दरम्यान रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
बंगाली बाबा आणि शिंदेगाव येथे अंडर बायपासचे काम सुरु आहे. त्यामुळे या ठिकाणी नियमीत वाहतूक कोंडी बघावयास मिळते. बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. सुट्टीच्या दिवशी नेहमी वाहतूक ठप्प होते. नियमित होणार्या वाहतूक कोंडीमुळे नाशिक-सिन्नर प्रवास जिकिरिचा झाला आहे.
वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलिसच नसल्याने वाहतूक कोंडीत आणखीण भर पडत होती. नियमित होणार्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशी वर्गामध्ये नाराजी सूर आहे. वेळाचा आणि पैशांचा अपव्य टाळण्यासाठी महामार्गचे काम जलद गतीने करण्याची मागणी प्रवाशीवर्गाकडून केली जात आहे.