Tue, Jul 23, 2019 06:16होमपेज › Nashik › नाशिक-पुणे महामार्गावर 'शिवशाही' लुटण्याचा प्रयत्न; ७ संशयितांना अटक

नाशिक-पुणे महामार्गावर 'शिवशाही' लुटण्याचा प्रयत्न; ७ संशयितांना अटक

Published On: Jan 12 2018 12:57AM | Last Updated: Jan 12 2018 12:56AM

बुकमार्क करा
सिन्नर: प्रतिनिधी

नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी घाटाच्या पायथ्याशी शिवशाही बस लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. 

पुण्याहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या शिवशाही बसचा (एमएच ०९, ईएन १९४०) पुढे जाणाऱ्या  कारला (एमएच ०२, पीएल ७५७६) धक्का लागला. या वादातून कारमधील राहुल संजय पाटील (२०), विकास रमेश पाटील(२४), गजानन केदा देवरे(३०), युवराज अनिल निकम (१८), सागर संजय पाटील (२२), साहेबराव बापू खैर(३८), शरद संतोष पवार  (२८) यांनी बसचालकाला मारहाण करत बसची चावीसह दोनशे रुपये काढून घेण्याचा प्रयत्न केला. बसचालकाने मुसळगाव पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर सातही संशयितांना अटक करण्यात आली.