Sat, Apr 20, 2019 15:53होमपेज › Nashik › नाशिक : जुना वाडा कोसळून एक ठार 

नाशिक : जुना वाडा कोसळून एक ठार 

Published On: Aug 05 2018 6:26PM | Last Updated: Aug 05 2018 6:26PMनाशिक : प्रतिनिधी 

शहरातील जुनी तांबट लेन येथील जुना वाडा कोसळून एक जण ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या घटनेत ढिगाऱ्याखाली दबलेल्या अन्य पाच जणांची सुखरूप सुटका करण्यात आली.
सार्थक काळे हे कुटुंबियांसह या वाड्यात राहत होते. त्यांना हा वाडा ढासळत असल्याची जाणीव सकाळीच झाली. त्यानंतर त्यांनी घरातील साहित्य हलविण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या मदतीसाठी त्यांचे मित्र करण राजेश घोडके (वय 21, रा. नाशिक) हे आले होते. मात्र तेवढ्यात वाडा कोसळला व त्यात घोडके यांचा मृत्यू झाला. मित्राला मदत करण्यासाठी आलेल्या घोडके यांच्यावर मैत्रीदिनाच्या दिवशीच काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, या घटनेत पडलेल्या वाड्याच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या काळे कुटुंबातील 5 सदस्यांना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नाशिकमधील जुन्या व पडक्या वाड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.