Thu, Apr 25, 2019 15:35होमपेज › Nashik › सरकारी कर्मचार्‍यांसाठी सुट्टयांचा दुग्धशर्करा योग..!

सरकारी कर्मचार्‍यांसाठी सुट्टयांचा दुग्धशर्करा योग..!

Published On: Jan 06 2018 1:26AM | Last Updated: Jan 05 2018 11:59PM

बुकमार्क करा
नाशिक : अंजली राऊत

यावर्षी सरकारी आणि बँक कर्मचार्‍यांची सुट्ट्यांमुळे चंगळ होणार आहे. यंदा काही सुट्ट्यांना शनिवार-रविवारला जोडून सुट्ट्या आल्या असल्याने वर्षभरात मोठ्या सुट्ट्यांचा आनंद लुटता येणार आहे.
प जानेवारी : 13 जानेवारीला दुसरा शनिवार असून 14 ला संक्रांत रविवारी आहे. तर 20 आणि 21 जानेवारीला शनिवार व रविवार असून सोमवार दि. 22 रोजी वसंत पंचमी असणार आहे. अशाप्रकारे  3 दिवस सुट्टी मिळू शकते. तसेच यंदाच्या वर्षी प्रजासत्ताक दिवस, म्हणजेच 26 जानेवारीची सुट्टी शुक्रवारी येत आहे आणि त्याला जोडूनच शनिवार-रविवारच्या (दि.27 व 28) सुट्ट्या आहेत.

प फेब्रुवारी : 10 आणि 11 फेब्रुवारीला शनिवार व रविवार आहेत.  सोमवारी 12 तारखेला सुट्टीचे नियोजन आखले तर 13 तारखेला महाशिवरात्र असल्याने एकूणच 4 दिवस सुट्टी मिळू शकेल.
प मार्च : गुरूवारी 1 मार्चला होळीची सुट्टी आहे. 2 तारखेला धुलीवंदन आहे. तर 3 व 4 तारखेला शनिवार व रविवारची सुट्टी आहे. त्यामुळे चार दिवस सुट्टी मिळू शकते. यंदाच्या वर्षी महावीर जयंती 29 मार्च रोजी येत असून त्या दिवशी गुरुवार आहे. शुक्रवारी गुड फ्रायडे असल्याने त्या दिवशीही सुट्टी असून त्यानंतर जोडूनच शनिवार-रविवार या आणखी दोन सुट्ट्या आल्याने चार दिवसांची सुट्टी कालावधी मिळेल.

प एप्रिल : 28 एप्रिलला चौथा शनिवार असून 29 एप्रिलला रविवार आहे. 30 एप्रिलला बुद्धपौर्णिमा आहे. त्यामुळे अशातर्‍हेने 3 दिवस सुट्टी मिळणार आहे. मे महिन्यात मात्र कोणताही वीकेंड राष्ट्रीय सुट्ट्या वा सणावारांचा नाही.प जून  : 15 जून रोजी रमजान ईदची पूर्वसंध्या असून शुक्रवारी नंतर शनिवार आणि रविवारच्या (दि. 16 आणि 17) अशा सुट्ट्यांचा आनंद घेता येईल. तसेच जुलै महिन्यातही सुट्ट्या वा सणावारांना जोडून वीकेंड नाही. प ऑगस्ट  : 15 ऑगस्ट बुधवारी आहे. जर गुरूवार व शुक्रवार सुट्टी घेतली तर शनिवार व रविवार जोडून असे सलग 5 दिवस सुट्ट्या घेऊ शकतो.सप्टेंबर :  या महिन्यातील दि.1 व 2 ला शनिवार व रविवारची सुट्टी आहे. तर सोमवारी 3 तारखेला जन्माष्टमी आहे. अशाप्रकारे 3 दिवसांची सुट्टी मिळेल. तसेच 13 तारखेला गणेश चतुर्थी आहे. 14 तारखेला सुट्टी घेतली तर त्यानंतर शनिवार व रविवार जोडून येत आहे. त्यामुळे एकूण 4 दिवस सुट्टी घेता येईल.