Thu, Apr 25, 2019 05:41होमपेज › Nashik › इगतपुरीत पुन्हा पार्टीच्या नावाखाली ‘छम-छम’ 

इगतपुरीत पुन्हा पार्टीच्या नावाखाली ‘छम-छम’ 

Published On: Mar 19 2018 1:53PM | Last Updated: Mar 19 2018 1:53PMनाशिक : प्रतिनिधी

इगतपुरी येथील तळेगाव शिवारातील हॉटेल मिस्टीक व्हॅली समोरील मोकळ्या जागेत अश्‍लिल नृत्य करणार्‍या 16 जणांना रविवारी (दि.18) मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यापैकी 10 जण नाशिकचे असून सहा जण मुंबईचे आहेत. त्यात एका पत्रकार संघटनेच्या पदाधिकार्‍यासह नगरपालिकेच्या कर्मचार्‍याचाही समावेश आहे. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात याच परिसरात एका हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी अश्‍लिल नृत्य करणार्‍या 7 मुली व 6 मुलांना ताब्यात घेतले होते. त्यात सरकारी आणि पोलिस अधिकार्‍यांच्या मुलांचा समावेश होता.

इगतपुरी येथ्लृील तळेगाव शिवारातील हॉटेल मिस्टीक व्हॅली येथ्लृील मोकळ्या जागेत मध्यरात्री 12.15च्या सुमारास डीजेच्या दणदणाटात काही तरुण, तरुणी अश्‍लिल नृत्य करीत असल्याचे इगतपुरी पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी कारवाई केली. त्यावेळी डॉ. राहुल मगनलाल जैन (33, रा. बागमार भवन, रविवार पेठ), अनिल लक्ष्मण बर्गे (42, रा. जुने नाशिक), लक्ष्मण राजेंद्र पवार (31, रा. पेठरोड), प्रकाश पांडुरंग गवळी (33, रा. मालेगाव स्टँड, पंचवटी), अर्जुन दत्तात्रय कवडे (23, रा. मखमलाबाद), वासू मोहन नाईक (44, रा. भद्रकाली), आकाश राजेंद्र गायकवाड (19, रा. पाथ्लृर्डी फाटा), हर्षद विजयकुमार गोठी (28, रा. पाथर्डी फाटा), चेतन दत्तात्रय कवरे (30, रा. मखमलाबाद रोड), के. अनंतलाल पंडित (35, रा. शिंगाडा तलाव) या नाशिकमधील संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्याचप्रमाणे मुंबईच्या विविध परिसरातील इतर सहा तरुणींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित तोकड्या कपड्यांमध्ये पायात घुंगरू बांधून अश्‍लिल नृत्य करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या संशयितांविरोधात मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. 

वाढदिवसाची पार्टी 

ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी एकाचा वाढदिवस असल्याने ही पार्टी ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. तसेच एक संघटनेचा पदाधिकारी आणि पत्रकार म्हणून मिरवत असल्याचेही समजते. 

अनेकदा कारवाई

गतवर्षी 4 ऑक्टोबरला पोलिसांनी इगतपुरी घोटी रस्त्यावरील रेन फॉरेस्ट रिसॉर्टमध्ये कारवाई करून मद्यपार्टी, अश्‍लिल नृत्य करणार्‍या 13 तरुण-तरुणींना अटक केली होती. त्यावेळी संशयित तरुण पुणे येथील होते. सातही अल्पवयीन मुली आणि मुंबईच्या होत्या. त्यामुळे या परिसरातील हॉटेलमध्ये पार्टीच्या नावाखाली ‘छम-छम’ नेहमीच चालत असल्याच्या चर्चेला दुजोरा मिळाला आहे. 

Tags : nashik, news, police, raid, dance party, Arrest,