Sun, Sep 23, 2018 00:18होमपेज › Nashik › नायगावजवळ अपघातात दुचाकीवरील दोघे ठार

नायगावजवळ अपघातात दुचाकीवरील दोघे ठार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक बसल्यामुळे दुचाकीवरील दोघे युवक ठार झाल्याची घटना सिन्नर तालुक्यातील नायगाव परिसरात घडली. सुयश रविंद्र पाटील (२८) आणि विशाल विजय वाटपाडे (२३) असे दोघे युवक ठार झाले आहेत. हे दोघेही रविवारी (दि.२६) रात्री आठच्या सुमारास बुलेटवरून सिन्नरहून नाशिकच्या दिशेने येत होते.

चिंचोळी फाटा येथे ट्रेक्टरने अचानक वळण घेतल्याने बुलेटवरील नियत्रंण सुटल्याने दोघेही ट्रॅक्टर ट्रॉलीला जाऊन धड़कले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दोघांना जिल्हा रुग्णालयात आणले यावेळी मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.