होमपेज › Nashik › नाशिकचे विमान आता नवीन वर्षात उडणार!

नाशिकचे विमान आता नवीन वर्षात उडणार!

Published On: Dec 02 2017 12:39AM | Last Updated: Dec 02 2017 12:27AM

बुकमार्क करा

नाशिक :

राज्यातील महत्त्वाच्या शहरांना हवाई मार्गाने जोडण्याचा पहिला टप्पा निकाली निघाल्यानंतर आता नाशिक शहर दुसर्‍या टप्प्याच्या स्पर्धेत आले असून, नवीन वर्षात नाशिकमधून विमानसेवा सुरू होणार आहे. हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली, गोवा, भोपाळ व अहमदाबाद या शहरांना नाशिक शहर जोडले जाणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

नाशिक येथे विमानतळ साकारल्यानंतर गेल्या अडीच तीन वर्षांपासून नाशिक एअर कनेक्टिव्हीटीपासून दूरच राहिले होते. यापूर्वी अनेकदा प्रयत्न होऊनही विमानाचे उड्डाण होऊ शकले नव्हते. 15 डिसेंबरला या विमानसेवेचा मुहूर्त निश्‍चित करण्यात आला होता. मात्र विमान कंपन्या व रूट निश्‍चित न झाल्याने आता विमानसेवा नवीन वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे. लहान शहरांमधील विमानतळे मोठ्या शहरांमधील विमानतळांना जोडले जावे यासाठी केंद्र शासनाने दोन वर्षांपूर्वी उड्डाण योजना जाहीर केली होती.