होमपेज › Nashik › भिडेंना २८ ला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

भिडेंना २८ ला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

Published On: Sep 01 2018 1:47AM | Last Updated: Aug 31 2018 11:19PMनाशिक :

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी जून महिन्यात नाशिकमध्ये झालेल्या एका सभेत आंबे खाल्ल्याने मुले होत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणी भिडे यांच्याविरोधात महापालिकेने जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला आहे. या प्रकरणात भिडे गुरुजी यांना शुक्रवारी (दि.31) नाशिकच्या जिल्हा न्यायालयात हजर होण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने  10 ऑगस्टला झालेल्या सुनावणीत दिले होते. मात्र, भिडे गुरुजी न्यायालयात हजर न झाल्याने खटल्याचे कामकाज पुढे ढकलण्यात आले असून, 28 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने भिडे यांना दिले आहे.