Mon, Apr 22, 2019 15:40होमपेज › Nashik › नरेंद्र दराडे यांचा राजीनामा

नरेंद्र दराडे यांचा राजीनामा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

कर्जमाफीची रक्कम मिळत नसल्याने शासनाविरुध्द संताप करत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. बँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल यांनी मंगळवारी (दि.28) हा राजीनामा विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांच्याकडे सुपूर्द केला. कर्जमाफीच्या पैशांसाठी अजून किती दिवस शेतकर्‍यांचा अंत बघायचा, असे कारण राजीनाम्यामागे असल्याचे सांगितले जात आहे. 

शिवसेनेत प्रवेश करण्याआधी दराडेे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान झाले होते.  त्यावेळी संचालकांनी आपापसात ठरल्यानुसार दराडे यांना एका वर्षासाठी हे पद दिले होते. एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मात्र दराडे यांनी खुर्ची सोडण्यास नकार दिला होता. दरम्यानच्या काळात त्यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव आणण्याच्याही हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यावर आपण पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे राजीनामा दिल्याचे दराडे यांनी त्यावेळीच स्पष्ट केले होते. पण, मंगळवारी मात्र त्यांचा राजीनामा थेट विभागीय सहनिबंधकांकडेच पोहोचल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शासनाने कर्जमाफी दिली. मात्र, प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसेच न आल्याने त्यांनी शासनावर त्रागा करत पदत्याग केला.