Thu, Nov 15, 2018 03:08होमपेज › Nashik › मुनी तरुणसागर यांच्या प्रकृतीत सुधारणा नाही

मुनी तरुणसागर यांच्या प्रकृतीत सुधारणा नाही

Published On: Sep 01 2018 1:47AM | Last Updated: Aug 31 2018 11:14PMनाशिक : प्रतिनिधी

जैन मुनी तरुणसागर महाराज यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. मात्र, त्यांनी अन्नत्याग केला नसल्याची माहिती मिळते आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होेण्यासाठी देशभरात प्रार्थना सुरू आहे. 

तरुणसागर महाराज हेे सध्या दिल्लीतील कृष्णानगर येथील राधापुरी जैन मंदिरात चातुर्मास स्थळी आहेत. तरुणसागर महाराज यांना 20 दिवसांपूर्वी कावीळ झाली होती. गुरुवारी (दि. 30) अधिकच खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार देत चातुर्मास स्थळी जाण्याची इच्छा व्यक्त केली.  दरम्यान, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पाच जैन संतांनी दिल्लीकडे धाव घेतली आहे, अशी माहिती येथील कार्यकर्ते पारस लोहाडे यांनी दिली.