नाशिक : प्रतिनिधी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक माणिक कोकाटे, परवेझ कोकणी, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. त्यातही कोकाटे आणि कोकणी आघाडीवर असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कधी अविश्वास ठरावाचे वारे तर कधी राजीनामा पालकमंत्र्यांकडे सोपविला असल्याचे सांगणारे दराडे यांचा राजीनामा अखेर मंगळवारी विभागीय सहनिबंधकांकडे पोहचला आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला. खरे तर, नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा बँकेत जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात जमा असलेल्या 342 पैकी 319 कोटी रुपये स्वीकारण्यास तब्बल आठ महिने लागल्याने बँकेची आर्थिक परिस्थिती ढासळली.