Fri, Aug 23, 2019 21:05होमपेज › Nashik › नाशिक :कळवण मध्ये भूकंपाचे सौम्य धक्के 

नाशिक :कळवण मध्ये भूकंपाचे सौम्य धक्के 

Published On: Dec 03 2017 7:49PM | Last Updated: Dec 03 2017 7:48PM

बुकमार्क करा

कळवण : प्रतिनिधी

तालुक्यातील जामले दळवट परिसरात रात्री व सकाळी ठिक १०:२० वा. भुकंपाचे सौम्य धक्के बसल्यामुळे घरांचे पञे, छपर, भांडी धक्याने हादरली त्यामुळे परिसरातील लोकांमधे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे  

दळवट हे तालुक्यातील भूकंपाचे केंद्र मानले जाते. त्यामुळे याठिकाणी भूकंपमापक यंत्र बसविले देखील होते मात्र आज याठिकाणी भूकंप मापक यंत्र अथवा धोक्याची सूचना देणारा सायरन नसल्याचे बोलले जाते आहे. आज सकाळी मेरी येथे संपर्क साधला असता, आज 11 वाजेपर्यंत येथील भूकंप मापक यंत्रावर नोंद नसल्याचे चारुलता चौधरी चौधरी यांनी सांगितले

दळवट परिसरातील भूकंपा बाबत तहसीलदार कैलास चावडे यांनी सांगितले की, सौम्य धक्के बसले आहेत मात्र कुठेही मालमत्तेची अथवा जीवीत हानी झाली नाही. महसूल आणि पोलीस यंत्रनेने या परिसराला भेट देऊन स्थानिक नागरिकांशी चर्चा केली.

रात्री देखील भूकंपाचे धक्के जाणवले मात्र रात्र असल्याने फारसे कुणाच्या लक्षात आले नाही. सकाळी जेव्हा 10 वाजून 20 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले त्यावेळी घरांना भूकंपाचे हादरे जाणवले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.