Fri, Nov 16, 2018 15:21होमपेज › Nashik › ‘निमा’ निवडणुकीत तिसर्‍या पॅनलची शक्यता 

‘निमा’ निवडणुकीत तिसर्‍या पॅनलची शक्यता 

Published On: Jul 13 2018 12:50AM | Last Updated: Jul 13 2018 12:01AMनाशिक : प्रतिनिधी

नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन (निमा)  संघटनेची निवडणूक 29 जुलैला होत आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 131 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर 141 अर्जांची विक्री झाली आहे. निमाच्या इतिहासात प्रथमच एवढे अर्ज प्राप्त झाल्यामुळे दोन्ही पॅनलकडून डावललेल्या उमेदवारांचा तिसरा पॅनल होण्याची शक्यता उद्योग वर्तुळात व्यक्‍त होत आहे. 

सत्ताधारी एकता पॅनलने 41 जागांसाठी 82 उमेदवारी अर्ज, तर विरोधी उद्योग विकास पॅनलने 60 अर्ज दाखल केले आहेत. आता 22 जुलै रोजी होणार्‍या माघारीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शासनाकडून एक प्रभावी दबावगट म्हणून काम करून घेण्यासाठी पॅनल तयार करण्यात आल्याचे विरोधी उद्योग विकास आघाडीचे नेते नगरसेवक तथा उद्योजक शशिकांत जाधव आणि प्रदीप पेशकार यांनी सांगितले.   संघटनेची निवडणूकप्रारंभी बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न झाले, त्यानंतर दुसरा पॅनल आणि अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आता तीन पॅनल होण्याची शक्यता आहे. 

निमाच्या इतिहासात पहिल्यांदाच इच्छुकांची संख्या वाढली असून, तीन पॅनल होण्याची शक्यता वाढली आहे. दि.22 रोजी होणार्‍या माघारीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.  दरम्यान तिसर्‍या पॅनल निर्मितीच्या हालचाली वेगवान झाल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे उद्योग वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.