Wed, Jul 17, 2019 08:10होमपेज › Nashik › नाशिक : गोदा अनन्य दीपोत्सव उत्साहात साजरा

नाशिक : गोदा अनन्य दीपोत्सव उत्साहात साजरा

Published On: Jan 27 2018 9:19PM | Last Updated: Jan 27 2018 9:19PMपंचवटी : देवानंद बैरागी

माघ शुद्ध दशमी अर्थात शनिवार दि २७ रोजी श्री गोदावरी नदीचा प्रगट दिनाचे औचित्य साधून गोदाप्रेमी सेवा समितीच्या वतीने संध्याकाळी ७ वाजता गोदावरी अनन्य दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

श्री गोदावरी नदी विषयी असलेली आत्मियता व्यक्त करण्यासाठी या गोदा अनन्य दीपोत्सवाला नाशिककरांनी उदंड प्रतिसाद देत रामकुंडावर एकच गर्दी केली होती. भाविकांनी यावेळी संपूर्ण रामकुंड परिसर दिव्यांनी उजळून टाकला होता. 

दिवाळी असल्यासारखा भास व्हावा असे चित्र निर्माण झाले होते. यावेळी गोदावरी नदीची महाआरती करण्यात आली. रामकुंडाच्या चारही बाजूला भाविकांनी आपल्या हातात दिवे घेऊन श्री गोदावरी नदीची महाआरती केली. या दीपोत्सवाला खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, भक्तिचरणदास महाराज, देवांग जानी, सतीश शुक्ल, डॉ हेमलता पाटील, वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर, कल्पना पांडे, रामसिंग बावरी, धनंजय पुजारी, उमापती ओझा, नरेंद्र धारणे, अतुल शेवाळे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.