Sun, Jul 12, 2020 20:55होमपेज › Nashik › कन्याशाळेला सावित्रीबाईंचे नाव देण्याबाबत उदासीनता

कन्याशाळेला सावित्रीबाईंचे नाव देण्याबाबत उदासीनता

Published On: Jan 03 2018 1:15AM | Last Updated: Jan 02 2018 11:45PM

बुकमार्क करा
नाशिक :

जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शासकीय कन्याशाळेला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यासंदर्भात करण्यात आलेला  ठराव सरकारने निकाली काढल्यानंतर प्रशासनानेही फारसा पुढाकार घेतला नसल्याने या शाळेचे नामकरण होता होता राहिले. विशेष म्हणजे, त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या नामकरणाचा मुद्दा हाती घेण्यात आला आणि त्यात संबंधितांना यशही आले.

शहरातील महात्मा गांधी रस्त्यावर शासकीय कन्या विद्यालय आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या साडेतीन हजारदरम्यान शाळा असल्या तरी मुलींसाठी हे एकमेव विद्यालय आहे.  विशेष म्हणजे, विद्यालयात शिक्षण घेणार्‍या मुली शहरातीलच आहे. केवळ मुलींसाठीच चालविणार्‍या जाणार्‍या या शाळेला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य उषा बच्छाव यांनी त्यावेळी केली होती. एवढेच नाही तर  तत्कालिन पंचायत समिती सभापती लक्ष्मी शेवाळे यांनी तसा ठराव सर्वसाधारण सभेत मांडला होता. हा ठराव मंजूरीसाठी सरकारला सादर करण्यात आल्यानंतर शाळेचे नामकरण करता येणार नसल्याचे जिल्हा परिषदेला कळविले गेले होते. सरकारने कळविले आणि त्यावेळच्या पदाधिकारी-सदस्यांनीही त्यावर समाधान मानले. नामंजूर केलेली मागणी मान्य करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याची तसदीही कोणी घेतली नाही. विशेष म्हणजे, त्यानंतर पुणे विद्यापीठाचे  नामकरण मुद्दा हाती घेण्यात आला आणि त्यात संबंधितांना यशही आले. पण, शासकिय कन्या विद्यालयाच्या नामकरणासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव त्यावेळी आणि आताही दिसून आला.