Mon, Jun 17, 2019 02:22होमपेज › Nashik › जुगार अड्ड्यावरील छाप्यात ४३ जणांवर कारवाई

जुगार अड्ड्यावरील छाप्यात ४३ जणांवर कारवाई

Published On: Sep 01 2018 1:47AM | Last Updated: Aug 31 2018 11:10PMनाशिक : प्रतिनिधी

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मालेगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने चांदवड शहरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुरुवारी (दि.30) रात्री 11 वाजेच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात जुगार खेळत असलेल्या 43 जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडील नऊ लाख 43 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

शुक्रवारी (दि.31) अटक केलेल्या 43 जणांची पोलिसांनी जामिनावर सुटका केली आहे. दरम्यान, जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत एकाच वेळी 43 जणांवर कारवाई करण्याची पहिलीच वेळ असल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. चांदवड शहरातून गेलेल्या मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या परिसरात तीन पत्ती नावाचा ताशपत्त्यांचा जुगाराचा अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती मालेगावचे नवनियुक्त अप्पर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना सूत्रांनी दिली होती. या माहितीच्या आधारावर मालेगावचे विशेष पोलीस पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार व्ही. चव्हाण, पोलीस हवालदार देवीदास निकम, पोलीस कॉन्स्टेबल नितेश खैरनार, अभिजित साबळे, दिनेश शेरावते, आर. सी. पी. 2 मधील पोलीस कॉन्स्टेबल सुभाष निकम, समाधान सानप, समाधान कदम, रणजीत साळुंखे, गुंजाळ आदींनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

या छाप्यात रवींद्र बबन वाघ (36, चांदवड), तुकाराम रामभाऊ कोतवाल (35, रा. कोतवाल वस्ती), आकाश विलास पवार (23, चांदवड), संदीप शशिकांत बिडगर (29, डावखरनगर), संजय नामदेव आरकडे (46, चांदवड), संदीप राऊत (32), ईश्‍वर बबनराव देवरे (42, चांदवड), बापू सावळीराम केदारे (40, चांदवड), विशाल गोविंदराव जाधव (25, चांदवड), जावेद अजीज बागवान (25, चांदवड), योगेश दौलत बच्छाव (32, चांदवड), मंजूर अकिल शेख (42, चांदवड), राहुल भिका अग्रवाल (27, चांदवड), प्रशांत मनोहर भापकर (33, चांदवड), गणेश पुंडलीक गांगुर्डे (27, रा. तिसगाव, चांदवड), केदा रामचंद्र आहिरे (29, रा. चांदवड), विष्णू रामभाऊ कोतवाल (31, चांदवड), संतनू विजय कोतवाल (22, चांदवड), विकास मधुकर पवार (47, चांदवड), अतुल शंकर कोतवाल (27, चांदवड), सचिन भाऊलाल अग्रवाल (35, चांदवड), रफिक बनेमिया बागवान (40, चांदवड), उत्तम वसंत सोनवणे (45, चांदवड), वैभव सुरेश कोतवाल (23, चांदवड), महेंद्र गुलाब बागूल (35, चांदवड), सचिन प्रकाश कोतवाल (34, चांदवड), आदित्य अशोक फलके (26, चांदवड), शरद पोपटराव कोतवाल (31, चांदवड), शंकर दत्तात्रय शिंदे (36, चांदवड), नीलेश भिका अग्रवाल (32, चांदवड), सुनील राजाराम गांगुर्डे (36, चांदवड), मोतीराम दिलीप गांगुर्डे (23, चांदवड), पांडुरंग दामू घुगे (55, चांदवड), बारकू चिंतामण राजगिरे (36, चांदवड), आनंदा राजू ठोंबरे (25, चांदवड), संतोष गिरीधर बडोदे (40, चांदवड), मयूर राजेंद्र बोरा जैन (30, लासलगाव), अमजद चांद पठाण (38, चांदवड), नीलेश बाळासाहेब पाटील (36, चांदवड), आनंदा भीमाजी गिते (51, आंबेगाव, येवला), सुरेश भास्कर जाधव (41, वडाळीभोई), जावेद शब्बीर शेख (36, लासलगाव), विठ्ठल बाबूराव ढगे (51, चांदवड) आदी 43 जण तीन पत्ती नावाचा ताशपत्त्यांचा जुगाराचा अड्डा खेळत असताना आढळून आले असता त्यांना पोलिसांनी अटक केली.

यावेळी त्यांच्याकडून तीन लाख 15 हजार 660 रुपये रोख, एक लाख 58 हजार किमतीचे 32 मोबाइल, 21 मोटरसायकल व एक चारचाकी वाहन किंमत चार लाख 70 रुपये असा एकूण नऊ लाख 43 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यांच्यावर चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.