Mon, Aug 19, 2019 07:42होमपेज › Nashik › भोंदूबाबाची कारागृहात रवानगी; 80 तोळे सोने जप्त

भोंदूबाबाची कारागृहात रवानगी; 80 तोळे सोने जप्त

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा


नाशिक : प्रतिनिधी

तरुणीस धमकावत तिच्याकडून चार लाख रुपये आणि 15 तोळे सोन्याचे दागिने खंडणी स्वरूपात घेऊन पुन्हा खंडणी मागणार्‍या कल्याणच्या भोंदूबाबा उदयराज रामआश्रम पांडे याची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली आहे. चौकशी दरम्यान, भोंदूबाबाकडे 80 तोळे सोन्याचे दागिने, एक किलो चांदीचे दागिने आणि 16 हजार रुपयांची रोकड सापडली आहे. 

गृहशांती आणि कौटुंबिक कलह दूर करताना पूजाविधीदरम्यान, अपशकुन झाल्याने पूजाविधी पूर्ण करा, नाहीतर वडिलांना मारून टाकू, अशी धमकी देत पांडे याने शहरातील तरुणीकडून चार लाख रुपये आणि 15 तोळे सोन्याचे दागिने घेतले होते. त्यानंतरही त्याने खंडणी मागितली होती. पोलिसांना याची भणक लागताच त्यांनी पांडेला अटक केली. न्यायालयाने त्याला दोन टप्प्यांत पंधरा दिवस पोलीस कोठडी सुनावली. कोठडीदरम्यान, त्याच्याकडे उत्तर प्रदेशमधील जौनपूर या गावी 50 लाख रुपयांचे आलिशान घर असल्याचे उघड झाले. तसेच त्याच्याकडून स्कॉर्पियो कार, बुलेट, 80 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, 1 किलो चांदीचे दागिने असा 29 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.