Mon, Feb 18, 2019 18:31होमपेज › Nashik › अमली पदार्थ विक्रिसाठी आनणाऱ्या तिघाना अटक

अमली पदार्थ विक्रिसाठी आनणाऱ्या तिघाना अटक

Published On: May 16 2018 4:35PM | Last Updated: May 16 2018 4:35PMनाशिक : प्रतिनिधि

'एमडी' हा घातक अंमलीपदार्थ नाशिकमध्ये विक्री करण्यासाठी येणाऱ्या तिघा संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने पहाटेच्या सुमारास पाथर्डी रोडवर सापळा लावून अटक केली आहे. 

रणजित गोविंदराव मोरे (वय ३२, पाथर्डी फाटा), पंकज भाऊसाहेब दुंडे (३१ रा. वृंदावन नगर, आडगाव शिवार) व नितीन भास्कर माळोदे (३२, रा. वृंदावन नगर, जत्रा हॉटेल जवळ) अशी या तिघां संशयिताची नावे आहेत. त्यांच्याकडून ५ लाख ३० हजार रूपये किमतीचे २६५ ग्रॅम एमडी ड्रग्ज, टाटा सफारी व मोबाईल असा एकूण १५ लाख ७६ हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.