Tue, Jul 07, 2020 10:52होमपेज › Nashik › जिल्हा बँकेचा काटेरी मुकुट कोण स्वीकारणार?

जिल्हा बँकेचा काटेरी मुकुट कोण स्वीकारणार?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक :  

नोटाबंदी आणि त्यानंतर शासनाच्या शेतकरी कर्जमाफीमुळे सद्या बँकेपुढे अडचणींचा डोंगर उभा आहे. अशा परिस्थितीत जिल्हा बँकेचा काटेरी मुकुट कोण स्वीकारणार, याबाबत जिल्हावासींयांमध्ये उत्सुकता आहे.

नवीन अध्यक्ष म्हणून कोकाटे, कोकणी, चव्हाण यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यातही बँकेची आर्थिक स्थिती भक्कम होण्यासाठी वसुलीची गरज आहे. त्यामुळे कठोर निर्णय घेणारा संचालकच अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसायला हवा, असे जाणकारांचे म्हणणे आहे.  सडेतोड स्वभावाचे कोकाटे अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. दुसरीकडे सर्वांनाच सांभाळून घेणारा अध्यक्ष असावा, असा मतप्रवाह असलेले काही संचालकही आहेत. अशा संचालकांची पसंती कोकणी यांना असल्याचे बोलले जाते. तसेही कोकणी यांनी यापूर्वी अध्यक्षपद भूषविले असल्याने अनुभव आहे. खरे तर, यापैकी कोणीही अध्यक्ष झाल्यास तो भाजपाचाच असणार आहे तरीही नाव निश्‍चित करताना वरिष्ठांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. एकूणच दराडे यांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपदासाठीचे इच्छुक तयारीला लागले आहेत.

 पीक कर्जमाफीच्या आशेने शेतकर्‍यांनी कर्ज भरण्यास नकार दिल्याने वसुलीही थांबली. त्यामुळे बँकेच्या तिजोरीत अधिकच खडखडाट झाला आणि दैनंदिन व्यवहारासाठीही पैसे शिल्लक राहिले नाहीत. घेणेकर्‍यांची संख्या वाढल्याने दरम्यानच्या काळात दररोजच आंदोलने होऊन बँकेला टाळे ठोकण्याच्याही घटना घडल्या. अशा ‘बिकट’ परिस्थितीचा सामना करणार्‍या दराडे यांनी त्या काळात अध्यक्षपद शाबूत ठेवले. पण, कर्जमाफीचे पैसे बँकेला मिळण्यास सुरूवात झाली असून, बँकेचा आर्थिक गाडा रूळावर येण्यासही सुरूवात झालेली असताना मात्र दराडे यांनी अचानक राजीनामा दिल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.