Fri, Apr 19, 2019 11:59होमपेज › Nashik › पाकच्या गोळीबारात धुळे जिल्ह्यातील जवान शहीद

पाकच्या गोळीबारात धुळे जिल्ह्यातील जवान शहीद

Published On: Jan 13 2018 7:48PM | Last Updated: Jan 13 2018 7:48PM

बुकमार्क करा
धुळे प्रतिनिधी

जम्‍मू काश्मीर येथे पाकिस्‍तानने केलेल्‍या गोळीबाराला चोख प्रत्‍युत्‍तर देताना धुळे जिल्‍ह्याचे सुपूत्र योगेश मुरलीधर भदाने हे शहीद झाले. 

जम्‍मू काश्मीर राज्‍यातील राजोरी सुंदरबनी सेक्‍टरमध्ये गस्तीवर असताना पाकिस्‍तानी सैनिकांकडून शस्‍त्रसंधीचे अल्‍लघन करत गोळीबार सुरू झाला. यावेळी योगेश आणि त्‍यांच्या सहकार्यानीही या गोळीबाराला चोख प्रत्‍युत्‍तर देण्यात सुरुवात केली. यावेळी सीमेपलिकडील गोळीबारात योगेश भदाने शहीद झाले.

योगेश भदाने हे २८ वर्षांचे होते. ते धुळे जिल्‍ह्यातील खलाने गावातले रहिवासी होते.  योगेश शहीद झाल्याची माहीती धुळयात येवुन पोहोचल्यावर धुळे जिल्हा आणि खलाणे गावावर शोककळा पसरली आहे.