Mon, Sep 24, 2018 20:46होमपेज › Nashik › नाशिक पालिकेचा वाद मुंबई दरबारी

नाशिक पालिकेचा वाद मुंबई दरबारी

Published On: Mar 16 2018 2:43PM | Last Updated: Mar 16 2018 2:43PMनाशिक : प्रतिनिधी

महापालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या उमेदवारीवरून झालेल्या वादानंतर नाराज सदस्यांनी पालकमंत्री गिरिश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे तक्रार करण्यासाठी आज दि. १६ रोजी सकाळी मुंबई गाठली आहे.

शहर भाजपात सुरू असलेल्या सुंदोपसुंदीमुळे गेल्या काही दिवसांपासून वाद उफळला आहे. सभापतीपदाची उमेदवारी देताना डावलले गेल्याने सभागृह नेते दिनकर पाटील आणि नगरसेवक उध्दव निमसे हे दुखावले गेले आहेत. तसेच शहर भाजपाचे पदाधिकारी व आमदारांच्या राजकारणामुळे अनेक सदस्य दुखावले गेले आहेत. यामुळे भाजपाकडे बहुमत असूनही सध्या नाराजीमुळे महापालिकेत पक्षाच्या कामकाजाला मरगळ आल्यासारखे वातावरण निर्माण झालेले आहे.