Mon, Apr 22, 2019 04:09होमपेज › Nashik › नाशिकचा पारा घसरला

नाशिकचा पारा घसरला

Published On: Dec 22 2017 1:28AM | Last Updated: Dec 21 2017 11:36PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

उत्तरेकडून येणार्‍या शीतलहरींचा परिणाम जिल्ह्याच्या तापमानावर झाला असून, पार्‍यात लक्षणीय घट झाली आहे. गुरुवारी (दि.21) निफाड येथे यंदाच्या मोसमातील सर्वांत नीचांकी 8.2 सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. वाढत्या थंडीचा फटका द्राक्षबागांना बसण्याची शक्यता आहे.

जिल्ह्याच्या पार्‍यात गेल्या आठवडाभरापासून चढ-उतार पाहायला मिळत आहे.  उत्तरेकडील जम्मू-काश्मीरमध्ये, तसेच शिमल्यामध्ये यंदाच्या हंगामात पहिल्यांदा बर्फवृष्टी झाली. या बर्फवृष्टीमुळे शीतलहरी निर्माण झाल्या असून, त्याचा परिणाम राज्यातील तापमानावर होत आहे. नाशिक जिल्ह्याचा पारा गुरुवारी 10 अंशांच्या खाली घसरला आहे.