Mon, Apr 22, 2019 05:42होमपेज › Nashik › बसवरील दगडफेकीमुळे नंदुरबार बंदला गालबोट

बसवरील दगडफेकीमुळे नंदुरबार बंदला गालबोट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिकः प्रतिनिधी

नंदुरबार येथे भारत बंद आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे बंदला गालबोट लागले असून शहादा तालुक्यात बसच्या काचा फुटल्या आहेत.

अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलाला विरोध करण्यासाठी विविध संघटनींनी देशभरात आज (सोमवार दि.02) भारत बंद पुकारला आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील दलित, आदिवासी आणि पुरोगामी संघटनांनी सहभाग घेत बंदसाठी आवाहन केले. दलित आदिवासी संघर्ष समितीच्या माध्यमातून या सर्व पदाधिकऱ्यांनी आवाहन करण्यासाठी नंदुरबार आणि अन्य तालुक्यातही ध्वज घेऊन घोषणा देत फेरी काढली. 

दरम्यान, काही ठिकाणी दुकानदारांना धमकावणे, फेकाफेक करणे, वाहनावर दगडफेक करणे असे प्रकार घडले. शहादा- पाडळदा या बसला अडवून दगडफेक करीत काचा फोडण्यात आल्या. यात कोणी प्रवासी जखमी झाला नसला तरी एसटीचे नुकसान झाले आहे. या घटनेची शहादा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.


  •