Tue, Nov 20, 2018 19:35होमपेज › Nashik › शस्त्रसाठा प्रकरणी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

शस्त्रसाठा प्रकरणी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

Published On: Dec 19 2017 2:04AM | Last Updated: Dec 18 2017 10:58PM

बुकमार्क करा

नाशिक :

चांदवड येथे पकडलेल्या शस्त्रसाठा प्रकरणातील मुख्य संशयित बद्रीनुजमान अकबर बादशाह ऊर्फ सुमीत ऊर्फ सुका पाचा याच्याकडे केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर येत असल्याचे समजते. मात्र, याबाबत ग्रामीण पोलिसांनी गोपनीयतेच्या नावाखाली चुप्पी साधली आहे. संशयित सुका पाचा याने टोळीतील इतर संशयितांचीही नावे सांगितल्याचे सूत्रांकडून समजते. 

उत्तर प्रदेश राज्यातील बांदा येथील शस्त्रविक्रीचे दुकान फोडून सुका पाचा याच्यासह इतर संशयितांनी रायफली, पिस्तूल, काडतुसे चोरली होती. त्यानंतर हा शस्त्रसाठा (एमएच 01 एसए 7460)या बोलेरो गाडीत चोरकप्पा बनवून त्यात लपवून मुंबईच्या दिशेने जात होते. मात्र, ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला. त्यात पोलिसांनी सुका पाचासह सलमान अमानुल्ला खान (19, शिवडी, मुंबई), नागेश राजेंद्र बनसोडे (23, रा. वडाळा) आणि त्यांच्या एका साथीदारास दुसर्‍या दिवशी मुंबईतून अटक केली आहे.