Thu, Jul 18, 2019 14:24होमपेज › Nashik › नाशिक विमानसेवेला २२ डिसेंबरचा मुहूर्त

नाशिक विमानसेवेला २२ डिसेंबरचा मुहूर्त

Published On: Dec 13 2017 1:58AM | Last Updated: Dec 13 2017 12:03AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

शासनाच्या उडाण योजनेंंतर्गत पहिल्या टप्प्यात एअर डेक्कनच्या 19 सीटर विमानाची सेवा येत्या 22 किंवा 23 डिसेंबरपासून नाशिक येथून सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. 

यासंदर्भात वेळापत्रक येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर करण्यात येणार असून, दक्षिण आफ्रिका येथून एअर डेक्कनने भाडेतत्त्वावर हे 19 आसनी क्षमता असलेले विमान आणले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक येथून एअर कनेक्टिव्हिटीबाबत केवळ घोषणाच होत असल्याने नाशिकचे विमान उड्डाण अनेकदा लांबणीवर पडले आहे. परंतु, केंद्र शासनाच्या उडाण योजनेत नाशिकचाही समावेश झाल्याने नाशिक आता देशातील सहा प्रमुख शहरांशी जोडले जाणार आहे.