Fri, Mar 22, 2019 08:25होमपेज › Nashik › करवाढविरोध : शेतकरी उभारणार लढा

करवाढविरोध : शेतकरी उभारणार लढा

Published On: Apr 11 2018 12:58AM | Last Updated: Apr 11 2018 12:10AMउपनगर : वार्ताहर

शेतजमिनींवर कर लादल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळे शहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीतर्फे मंगळवारी (दि.10) सायंकाळी पाचला जेलरोडच्या राजराजेश्‍वरी मंगल कार्यालयात बाधित शेतकरी व मिळकतधारकांचा मेळावा झाला. शहरातील शेतजमीन तसेच मोकळ्या भूखंडांवर नव्याने कर लावण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. त्यामुळे शेतकरी व मिळकतधारकांवर झालेल्या अन्यायाविरोधात कृती समिती महापालिका क्षेत्रात जनजागृती मेळावे घेऊन लोकांना संघटित होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या मेळाव्याला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

यावेळी भाजपाचे मंडल अध्यक्ष बाजीराव भागवत म्हणाले की, लोक संघटित झाले तर हा लढा उभारला जाईल. दोन गावांना संघटित करण्याची जबाबदारी आपण घेत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. आ. बाळासाहेब सानप म्हणाले की, पक्षभेद विसरून मी शेतकरी म्हणून या आंदोलनात सहभागी झालो आहे. करवाढीचा प्रश्‍न पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या दरबारात नेणार असल्याते ते म्हणाले. यावेळी निवृत्ती अरिंगळे यांनी 13 टक्क्यांंनी करवाढ केली ती चुकीची असल्याचे सांगत सत्तधार्‍यांनी या प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी राजीनामा अस्त्र वापरण्याची गरज व्यक्त केली.

दत्ता गायकवाड, उन्मेष गायधनी यांनी शेतकर्‍यांनी संघटित होण्याची गरज असल्याचे सांगितले. माजी नगरसेवक जे. टी. शिंदे, रंजन ठाकरे, गजानन शेलार, नगरसेवक गुरुमित बग्गा, मनीष बस्ते रमेश औटे यांनी मार्गदर्शन केले. 
 

 

 

 

tags : nashik,news, action, Committee, against, farmer's, injustice, taxes, on, land,