Wed, Jul 17, 2019 09:59होमपेज › Nashik › संरक्षण साहित्य निर्मितीत नाशिक अनुकूल

संरक्षण साहित्य निर्मितीत नाशिक अनुकूल

Published On: Sep 01 2018 1:47AM | Last Updated: Aug 31 2018 11:08PMनाशिक :

नशिक हे एचएएल मिग विमान उत्पादनाचे प्रमुख केंद्र  आहे. नौदलातील रशियन हेलिकॉप्टर्स व विमानांचे देशांतर्गत उत्पादन, संबंधित सेवा व व्यवस्थेसाठी नाशिकमधील उद्योगांचे योगदान मोलाचे ठरणार असल्याचा विश्‍वास नौदलाचे रिअर अ‍ॅडमिरल व्ही.एम. डॉस (विशेष सेवा मेडल) यांनी व्यक्त केला.  

 देशांतर्गत उत्पादनास प्रोत्साहन देणे व त्याकरीता खासगी क्षेत्रातील उद्योगांशी समन्वय साधून स्वयंपूर्णता साधणे या उद्देशाने सातपूरच्या निमा हाऊस येथे  नेव्हल एव्हीएशन-इंडस्ट्रि इंटरॅक्शन   उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी प्रथम सत्रात निमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, कमांडर राजेश बाबू, ऑफिसर इन चार्ज-एनएलसी, नाशिक, मेक इन नाशिक समितीचे अध्यक्ष श्रीकांत बच्छाव, नौदलातर्फे रिअर अ‍ॅडमिरल व्ही. एम. डॉस (विशेष सेवा मेडल),  कमांडर एन. बालकृष्णन व्यासपीठावर उपस्थित होते.   डॉस म्हणाले की, रशियन बनावटीची विमाने, संबंधित सेवांच्या बाबतीत देशांतर्गत उत्पादनाच्या मोठ्या संधी असून, त्याद्वारे खासगी क्षेत्रातील उद्योगांना व्यवसायवाढीच्या संधी निश्‍चितच उपलब्ध होतील.  नाशिकमधील उद्योगांकडून संरक्षण साहित्याच्या उत्पादनात मोठा सहभाग राहू शकले असा  विश्‍वास देखील त्यांनी व्यक्त केला.‘मेक इन नाशिक’ समितीचे अध्यक्ष श्रीकांत बच्छाव यांनी कार्यक्रमाच्या  प्रारंभी उपस्थितांचे स्वागत केले. प्रेझेंटेशनदरम्यान  कमांडर एन. बालकृष्णन यांनी माहिती देतांना नौदलाची उद्दिष्टे स्पष्ट केली.  राजेश बाबू यांनी  आभार मानले.  कार्यक्रमास निमा उपाध्यक्ष शशिकांत जाधव, खजिनदार कैलास आहेर, सचिव सुधाकर देशमुख, अतिरिक्त उपाध्यक्ष संजय सोनवणे, कार्यकारिणी सदस्य उदय रकिबे, कमलेश नारंग, मनिष रावल, श्रीपाद कुलकर्णी, हर्षद ब्राह्मणकर, तेजपाल बोरा, गौरव धारकर तसेच उद्योजक उपस्थित होते.   कार्यकारिणी सदस्य राजेश गडाख यानीं कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून कामकाज पाहिले.