उन्हाळ काद्याला उच्चांकी ३८२७ रूपये भाव 

Published On: Sep 18 2019 6:17PM | Last Updated: Sep 19 2019 1:31AM
Responsive image


लासलगाव  : वार्ताहर 

आशिया खंडातील प्रथम क्रमांकाच्या कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला गेल्या वीस महिन्यातील उच्चांकी असा ३८२७ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. त्‍यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

देशांतर्गत कांद्याची मागणी वाढल्याने ५ ऑगस्ट २०१९ च्या तुलनेत कांदा दरात १९०% ने वाढ झाली. कांद्याला ५ ऑगस्टला किमान ६७१ जास्तीत जास्त १३२५ सरासरी १२५१ रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला होता.

येथील मुख्य बाजार आवारावर या हंगामातील सरासरी कांद्याला ३५०० रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी बाजार भाव मिळाला. २९ जानेवारी २०१८ रोजी कांद्याला २४५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाले. 20 महिन्याच्या मोठ्या कालावधीनंतर आज कांद्याला सरासरी ३५०० रुपयांचा उच्चांकी असा भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, शासनाने कांद्याचे बाजार भाव मोडीत काढण्यासाठी कुठलेही निर्बंध लादू नये अशी मागणी केली जात आहे.