Wed, Jul 24, 2019 06:00होमपेज › Nashik › नायलॉन मांजावर कागदोपत्रीच बंदी

नायलॉन मांजावर कागदोपत्रीच बंदी

Published On: Dec 13 2017 1:58AM | Last Updated: Dec 12 2017 11:46PM

बुकमार्क करा

नाशिक : विशेष प्रतिनिधी 

अनेक वर्षांपासून संक्रांतीमध्ये पतंग उडवताना नायलॉन मांजामुळे होणार्‍या अपघातांची संख्या वाढली आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन आदेश काढतात. काही ठिकाणी  धाडी टाकून कारवाईदेखील केली जाते. एका बाजूला विक्री करायची नाही, असा निर्धार करणारे विक्रेते मागील दाराने विक्री करीत असल्याने बंदीचा आदेश फक्त कागदोपत्री असल्याचे वास्तव आहे. मांजामुळे पक्ष्यांबरोबरच रस्त्याने जा-ये करणार्‍या दुचाकीस्वारांवरही संक्रांत कोसळत आहे. 

पंचवटीत पतंग उडवताना एका दहावर्षीय बालकाचा मृत्यू झाला. संक्रांतीपूर्वी किंवा संक्रांतीच्या काळात शहरातील विविध भागांत अशा घटना घडतात. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर गतवर्षी शहरातील काही व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने नायलॉन मांजा विक्री करणार नाही असा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतरही अनेक व्यावसायिकांनी आर्थिक हित लक्षात घेता मांजाची विक्री केली.प्रामुख्याने सिडको, सातपूर परिसरात आजही चोरीछुप्या पद्धतीने मांजाची विक्री सुरू असल्याने कागदोपत्री बंदीचा फायदा काय, असा  सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.