Thu, Aug 22, 2019 04:20होमपेज › Nashik › जिल्ह्यात दमदार पाऊस

जिल्ह्यात दमदार पाऊस

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 18 2018 12:05AMनाशिक : प्रतिनिधी

जिल्ह्यात दोन दिवसांपासून कोसळणार्‍या श्रावणसरींमुळे धरणांमधील आवक कायम आहे. सहा धरणे शंभर टक्के भरली आहेत. नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 91.01 टक्के भरले आहे. धरणातून 2024 क्यूसेक वेगाने विसर्ग केला जात असल्यानेे गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि.17) जिल्ह्यात 100 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.  पंधरवड्यापासून गायब झालेल्या पावसाने दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुक्काम ठोकला आहे.