होमपेज › Nashik › नाशिक : पाण्याच्या टाकीत बुडून ५ वर्षीय बालकाचा मृत्यू

नाशिक : पाण्याच्या टाकीत बुडून ५ वर्षीय बालकाचा मृत्यू

Published On: Dec 14 2017 4:45PM | Last Updated: Dec 14 2017 4:45PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

घराजवळील पाण्याच्या टाकीत पडून पाच वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना टाकळी ड्रीम सिटीजवळ शिवाजी नगर परिसरात घडली. अश्‍विन संतोष कोठुळे (शिवाजी नगर) असे या बालकाचे नाव आहे. 

सिडकोत चार दिवसांपूर्वी पाण्याच्या टाकीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने पाण्याच्या उघड्या टाकींचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. अश्‍विन घराजवळ खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडला. टाकीत पाणी असल्याने  ही गोष्ट लगेच न समजल्याने अश्‍विनचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते, मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.