Sun, Jul 05, 2020 05:00होमपेज › Nashik › ज्येष्ठ रंगभूषाकार नारायण देशपांडेंचे निधन

ज्येष्ठ रंगभूषाकार नारायण देशपांडेंचे निधन

Published On: Dec 17 2017 12:04AM | Last Updated: Dec 16 2017 11:59PM

बुकमार्क करा

नाशिक :

येथील ज्येष्ठ रंगभूषाकार व अभिनेते नारायण वामन देशपांडे (70) यांचे शनिवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे निधन झाले.

शहरातील पहिले रंगभूषाकार अशी ओळख असलेले देशपांडे हे एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त कुडाळ येथे सहकुटुंब गेले होते. तेथे त्यांची प्रकृती अचानक बिघडली व त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी सुषमा, मुलगा परिक्षित असा परिवार आहे.  ‘नाट्यनम्रता’ संस्थेचे ते संस्थापक उपाध्यक्ष होते. 1970 मध्ये ‘नाट्यनम्रते’च्या स्थापनेत उपेंद्र दाते, रवींद्र ढवळे यांच्या बरोबरीने देशपांडे यांचा पुढाकार होता. ‘कौंतेय’, ‘तीन चोक तेरा’, ‘बुडत्याचा पाय खोलात’, ‘पुत्र’ आदी अनेक नाटकांत त्यांनी भूमिका केल्या. पुढे संस्थेची गरज म्हणून त्यांनी रंगभूषाकाराचा पेशा स्वीकारला.