Tue, Jan 22, 2019 20:00होमपेज › Nashik › नंदुरबारला दुचाकीचा स्फोट होऊन तीन ठार

नंदुरबारला दुचाकीचा स्फोट होऊन तीन ठार

Published On: Mar 19 2018 1:48AM | Last Updated: Mar 19 2018 1:48AMनंदुरबार : रिक्षा व दुचाकीत समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत तीन जण जागीच ठार तर एकजण जखमी झाला आहे. घटना इतकी भीषण होती की, दुचाकीचा स्फोट होऊन त्यात तिघेजण जाळले आहेत. रविवारी (दि.18) सायंकाळी अंकलेश्‍वर बुर्‍हानपूर रास्तवरील राजमोही नजीक  हा अपघात झाला. रस्त्याने जाणार्‍या नागरिकांनी ही आग विझवली. मिळालेल्या माहितीनुसार तलोद्याहून अक्कलकुवाकडे जात असलेली रिक्षा आणि तळ्याद्याकडे येत असलेली दुचाकीमध्ये राजमोही नजीक समोररासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये दुचाकीच्या पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन संपूर्ण दुकाचीने पेट घेतला. यात तिघेजण गंभीररित्या भाजले.