Wed, Nov 13, 2019 12:59होमपेज › Nashik › विहिरीत उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या

विहिरीत उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या

Published On: Dec 13 2017 1:58AM | Last Updated: Dec 13 2017 12:05AM

बुकमार्क करा

नांदगाव : प्रतिनिधी

ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत, ही सासरच्या मंडळींची मागणी पूर्ण न झाल्याने गर्भवती महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे घडली. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात सासू, सासरे, पती यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी घटनास्थळी किरकोळ दगडफेकीची प्रकारही घडला.

नांदगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून फिर्यादी दत्तू राजाराम सरोदे (रा. जळगाव खुर्द, ता. नांदगाव) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मयत अपेक्षा विजय मवाळ (21, रा. पिंपरखेड) ही सासरी राहत असताना सासरकडील मंडळी पती विजय माधवराव मवाळ, सासरे माधवराव नाना मवाळ, सासू नंदूबाई मवाळ (सर्व रा. पिंपरखेड) यांनी संगनमत करून अपेक्षा हिच्याकडे ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न झाल्याने तिचा मानसिक, शारीरिक छळ होत असल्याने गरोदर असलेल्या अपेक्षाने घराशेजारील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.