Fri, Sep 20, 2019 04:44होमपेज › Nashik › गोळीबारमध्ये धुळ्यात युवकाचा मृत्यू

गोळीबारमध्ये धुळ्यात युवकाचा मृत्यू

Published On: Dec 11 2017 11:39PM | Last Updated: Dec 11 2017 11:39PM

बुकमार्क करा

धुळे : यशवंत हर्णे

धुळे तालुक्यातील वार कुंडाणे शिवारात गावठी पिस्तुलाने केलेल्या गोळीबारात तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी राञी साडे नऊ वाजता घडली आहे. कुंडाणे शिवारात एका शेतामध्ये दीपक दगडू वाघ (वय २८) या तरुणाला गंभीर जखमी आवस्थेत वैद्यकिय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, माञ उपचारापूर्वी त्याचे निधन झाले. दीपकच्या छातीत गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. 

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे,  रमेशसिंह परदेशी हे पथकासह रुग्णालयात दाखल झाले. मृत दीपक मित्रांबरोबर मद्यपान करीत होता यावेळी खाण्यासाठी साहित्‍य आणण्यासाठी पेट्रोल पंपाजवळ गेला होता. यावेळी तिथे मोठा आवाज झाल्याचे लक्षात आल्यावर मित्र तिथे गेले. यावेळी दीपक जखमी आवास्‍थेत पडला होता अशी माहिती त्‍याच्या मित्रांनी दिली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex