Sun, Apr 21, 2019 14:19



होमपेज › Nashik › आर्थिक वादातून देवळ्यात खून

आर्थिक वादातून देवळ्यात खून

Published On: Jun 18 2018 1:11AM | Last Updated: Jun 17 2018 10:50PM



मेशी :

मेशी-महालपाटणे रस्त्यावर रणादेवपाडे शिवारात सडक सौंदाणे येथील प्रभाकर पवार यांचा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

देवळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी (दि.16) सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास संशयित आरोपी संतोष श्रावण कुवर (20 रा. मेशी, आदिवासी वस्ती, ता. देवळा) व मयत प्रभाकर दत्तू पवार (40, रा. सौंदाणे, ता. मालेगाव) यांच्यात आर्थिक देवाणघेवाणीतून वाद होऊन संशयित आरोपी संतोष याने मयत प्रभाकर पवार यांच्या मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करून रणादेवपाडे शिवारात भर रस्त्यात ठार केले व आरोपी तेथून पसार झाला रस्त्यावर रक्‍ताच्या थारोळयात मयत व्यक्‍ती बघून आसपासच्या लोकांनी देवळा पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता देवळ्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृताच्या मोबाइलवरून नातेवाइकांना घटनेची माहिती दिली.

शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री 10 वाजता संतोष श्रावण कुवर याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. याबाबत पंकज रमेश पवार यांच्या फिर्यादीवरून संतोष कुवर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, रविवारी सकाळी 9 वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी वळवी यांनी घटनास्थळी भेट दिली.