Thu, Apr 25, 2019 23:25होमपेज › Nashik › नांदुरी शिवारातील खुनाचा छडा

नांदुरी शिवारातील खुनाचा छडा

Published On: Apr 07 2018 1:38AM | Last Updated: Apr 06 2018 11:14PMकळवण : वार्ताहर

तालुक्यातील नांदुरी गड शिवारात 31 मार्च 2018 रोजी सापडेल्या संशयास्पद सापडलेल्या व्यक्‍तीच्या मृत्यूचा उलगडा झाला असून, या व्यक्‍तीचा खुन केल्याची कबुली संशयित आरोपींनी दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणातील तिघांना अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, चैत्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मध्यरात्री कळवण रस्त्यावरील चिखलपाडा फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला एका व्यक्‍तीचा मृतदेह आढळून आला होता. कळवण तालुक्यातील पाळे खु॥ प्रभाकर राजाराम सोनवणे या व्यक्‍तीचा हा मृतदेह असल्याचे पोलीस तपासात निष्पन्‍न झाले होते. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांनी या प्रकरणाचा शोध सुरु केला. तपासादरम्यान खबर्‍याकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पाळे खु॥ येथील काही तरुण सप्तशृंगगडावर दर्शनासाठी आले होते.

त्यांच्या एका व्यक्‍तीबरोबर वाद झाल्याची माहिती मिळाली. त्या दिशेने पोलिसांनी तपास केला असता विशाल समाधान शिंदे (रा. कळवण खु॥, ता. कळवण), सुमित कैलास देवरे (रा. कुंडाणे, ता. कळवण), ऋषिकेश विलास जाधव (रा. पाळे बु॥, ता. कळवण) यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखविताच संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. कळवण रस्त्यावर एका पुरुषास लाकडी दांड्याने तोंडावर व बरगडीवर मारहाण करून लोखंडी कटरने वार करुन जिवे मारल्याची कबुलीही दिली. सदर कामगिरी अशोक करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, सहायक पोलीस उप निरीक्षक रवींद्र शिलावट, पोलीस हवालदार दीपक आहिरे, दत्तात्रय साबळे, गणेश वराडे, पुंडलिक राऊत, पोलीस नाईक अमोल घुगे, पोलीस कॉन्स्टेबल विश्‍वनाथ काकड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, राजू वायकंडे, संदीप लगड, रमेश काकडे, भूषण रानडे यांनी केली.

Tags : Nashik, murder, case, solve,  Nanduri Gad