Mon, Nov 19, 2018 21:02



होमपेज › Nashik › नाशिक : भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीचा खून

नाशिक : भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीचा खून

Published On: May 10 2018 1:24PM | Last Updated: May 10 2018 1:24PM



नाशिकरोड : वार्ताहर 

भंगार आणि पुष्ठा गोळा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून करण्यात आला. नाशिकरोड येथील वास्को चौकात पहाटे तीन ते साडेचार वाजेच्या दरम्यान घटना घडली.  खुनाचे नेमके कारण समजले नसून पोलिस संशयित तिघांचा शोध घेत आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळू उर्फ बाळासाहेब दिनकर दोंदे (४१, रा रोकडोबावाडी , देवळाली गाव ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे . त्यांच्या पश्चात बायको कमल(३८), मुलगा कृष्णा (११ ), मुलगी प्रचिता (९)  असा परिवार आहे. बुधवारी  ( दि.१० ) मध्यरात्री नेहमी प्रमाणे बाळासाहेब भंगार गोळा करण्याकरिता घराबाहेर गेले. त्यावेळी कोणीतरी तीन अज्ञात व्यक्तींनी बाळासाहेब दोंदे यांना दगडाने बेदम मारहाण केली. मारहाणीचे कारण नेमके समजू शकले नाही. त्यांच्या तोंडामधुन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याचे त्यांना ओळखणारे संतोष कटारे (रा.  सिन्नरफाटा पोलीस चौकी मागे ) यांनी पाहिले होते. तर बाळासाहेब दोंदे यांनी कटारे यांना भंडारी प्लाउड दुकाना समोर जाऊ नको , तिथे तीन व्यक्ती असून त्यांनीच  मला दगडाने मारहाण केली आहे. असे सांगितले. त्यामुळे कटारे सुभाष रोड या भागाकडे निघून गेले. 

दरम्यान, मयत बाळासाहेब दोंदे यांचे मोठे भाऊ अनिल आणि धनवंतर दोंदे यांचा महावीर बॅगच्या दुकानजवळ चहाचा हातगाडा आहे दोघेही चेहडी परिसरात वास्तव्यास आहे. अनिल दोंदे यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . 

संशयित लवकरच ताब्यात

दरम्यान, नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी संशयित गुन्हेगारांचा शोध सुरू असून लवकरच गुन्हेगाराना अटक केली जाईल अशी प्रतिक्रिया दिली.

Tags :nashik, nashik murder case, stone pelting