होमपेज › Nashik › काळे फासल्याप्रकरणी खासदार गोडसे यांच्यासह १६ जण निर्दोष

काळे फासल्याप्रकरणी खासदार गोडसे यांच्यासह १६ जण निर्दोष

Published On: Dec 14 2017 7:48PM | Last Updated: Dec 14 2017 7:47PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला काळे फासल्याप्रकरणी व त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकल्याच्या आरोपातून आज तत्कालिन जिल्‍हा परिषदेचे सदस्य आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसे, बाळासाहेब वाघ यांच्यासह सोळा जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. शर्मा यांनी खटल्याचा निकाल घोषित केला. 

पाणीपुरवठा योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, यासाठी सात वर्षांपूर्वी बागलाण तालुक्यातील अंतापूर येथील शेतकरी जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसले होते. त्यावेळी हेमंत गोडसे आणि बाळासाहेब वाघ हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. गोडसे -वाघ यांच्या नेतृत्वाखाली ९ सप्टेंबर २०११ रोजी उपोषणार्थीच्या शिष्टमंडळाने जि. प. चे तात्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजितकुमार मेहता यांच्या दालनात प्रवेश केला. त्यावेळी रणजितकुमार मेहता यांच्या तोंडाला काळे फासत मेहता यांच्या अंगावर ज्वलणशील पदार्थ टाकल्याचा आरोप हेमंत गोडसे, बाळासाहेब वाघ यांच्यासह सोळा जंणावर करण्यात आला होता.

गेल्या सहा वर्षांपासून सदर गुन्हयाचा खटला न्यायालयात सुरू होता. अखेर या खटल्याचा निकाल आज लागला. न्यायमुर्ती एस. आर. शर्मा यांनी या खटल्यातील सोळाही आरोपींची निदोष मुक्तता केली. न्यायालयाने दरम्यानच्या काळात नऊ साक्षीदारांची साक्ष तपासणी. अॅड. अविनाश भिडे, एम. वाय. काळे, एस. जे. देशपांडे, दीपक पाटोदकर, सचिन भाटे या वकीलांनी आरोपीच्यावतीने तर अॅड. कोतवाल यांनी सरकारचे वकील म्हणून कामकाज पाहिले. न्यायालयान निर्दोष निकाल घोषित केला.