Sat, Nov 17, 2018 01:43होमपेज › Nashik › आ. पटेल यांच्या सीएचा मृतदेह आढळला

आ. पटेल यांच्या सीएचा मृतदेह आढळला

Published On: Jan 21 2018 2:51AM | Last Updated: Jan 21 2018 1:34AMधुळे : प्रतिनिधी

मुंबई येथील मीरा रोड रेल्वे स्थानकानजीक आमदार अमरिश पटेल यांंच्या लेखापालाचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा धुळे परिसरात होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून डिसान ग्रुपवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकून तपासणी सुरू केली आहे. शिरपूर येथील विधान परिषदेचे आमदार अमरिश पटेल यांचे लेखापाल कुट्टी (64)  यांंचा मृतदेेह शनिवारी (दि.21) मुंबईमधील मीरारोड रेल्वेस्थानकाजवळ आढळून आला आहे. या प्रकरणाची रेल्वे पोलिसांत तसेच संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे.