Sat, Jul 20, 2019 15:03होमपेज › Nashik › बेपत्ता आठ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला

बेपत्ता आठ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला

Published On: Jun 13 2018 11:19AM | Last Updated: Jun 13 2018 11:19AMजळगाव  : प्रतिनिधी

कोणालाही न सांगता बेपत्ता झालेल्या आठ वर्षीय मुलीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.  कालपासून शोधमोहिम सुरु होती. आज सकाळी सात वाजता मुलीचा मृतदेह एका पोत्यात आढळून आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,  मुलगी बेपत्ता झाल्यानंतर आईने शोधाशोध केली परंतू तीचा पत्ता न लागल्याने पोलिसांत तक्रार केली होती. त्यांनतर रात्रभर पोलिसांनी समतानगर परिसर पिंजून काढला. तरीही मुलीचा शोध लागला नाही. आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास छिन्नविछिन्न अवस्थेत एका पोत्यात मृतदेह सापडल्याने जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.