Sun, Apr 21, 2019 03:51होमपेज › Nashik › बेपत्ता मुलीच्या पित्याची गळफास घेऊन आत्महत्या

बेपत्ता मुलीच्या पित्याची गळफास घेऊन आत्महत्या

Published On: Apr 09 2018 1:31AM | Last Updated: Apr 09 2018 12:14AMमालेगाव : प्रतिनिधी

बेपत्ता किशोरवयीन मुलीच्या पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चंदनपुरीतील भोसलेवाडी भागात रविवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. आप्तेष्टांसह ग्रामस्थांनी मुलीला फूस लावून पळवून नेणार्‍या युवकाची माहिती दिल्यानंतरही पोलिसांनी तत्काळ तपासचक्र न फिरवले नाही. तीन दिवसांपासून सैरभैर झालेल्या बापाने विषण्ण अवस्थेतूनच आपली जीवयात्रा संपविल्याचा आरोप करत संबधित युवक व त्याला सहाय्य करणार्‍यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी किल्ला पोलीस ठाण्यात गर्दी केली होती.

भोसलेवाडी येथील किशोरवयीन तरुणी शाळेतून निकाल घेण्यासाठी 5 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता घराबाहेर पडली होती. ती परत न आल्याने मजुरी करणार्‍या आईने किल्ला पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तपासात चंदनपुरीतील 25 वर्षीय रिक्षाचालक युवकाने तिला फूस लावून पळवून नेल्याचे उघड झाले. तालुक्यातीलच एका गावात ती असल्याचीही माहिती पुढे आली. या घटनेमुळे तणावात असलेल्या पित्याने रविवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या आप्तेष्ट व ग्रामस्थांनी किल्ला पोलीस ठाणे गाठून त्या युवकासह त्याच्या कुटुबियांवर खुनाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी केली.

पोलीस व ग्रामस्थांमध्ये शाब्दीक खटके उडाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी आप्तेष्ट व स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू होती. दरम्यान, संबंधित युवकाच्या कुटुंबियांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेे. मयत व्यक्‍ती मजुरी व यंत्रमाग चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. त्यांच्या पश्‍चात दोन मुली व दोन मुल असा परिवार आहे.

Tags : nashik, nashik news, missing daughter,  father Suicide,